Vijay Kamble
भाषा
Vijay Kamble
विजय कांबळे यांच्या अधिकृत साइटवर तुमचे स्वागत

विजय कांबळे म्हणजे एक झुंजार नेतृत्व. विजय कांबळेंनी मोडकळीस आलेल्या कामगार चळवळीचा एक मजबूत कणा बनून त्या चळवळीला पुनर्जिवीत केले. कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या समजून घेऊन, त्यांच्या लड्यामधे त्यांच्या पाठिशी उभे राहणारे, त्यांना योग्य तो न्याय मिळवुन देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे विजय कांबळे.विजय कांबळेंचा जन्म हा त्यांच्या आजोळी म्हणजे कोल्हापूरातील इटकरे गावी १८ नोव्हेंबर १९४० ला झाला.

आठ भावंडांमधे सर्वात मोठे.घरची परिस्थिती तशी सर्वसाधारण. वडील बाबुराव धोंडिबा कांबळे, पेशाने शिक्षक. एका प्राथमिक शाळेतुन मिळणाऱ्या पगारातुन घर चालवणे तसे मुश्किल, म्हणून १९२०-२२ च्या आसपास सर्व कुटुंबास घेऊन त्यांनी मुंबई गाठली.मुंबईला बांद्रा पश्चिम भागात एका नगरपालीकेच्या शाळेत वडिलांची नोकरी चालू झाली. नोकरी चालू झाली, तरी घराचा प्रश्न बाकी होता. शिक्षकी पेशाबरोबर वडील एक दलित वर्गाचे पुढारी म्हणूनही गणले जायचे, त्यातूनच त्यांची काँग्रेसचे बी. जी. खैर, वैकुंठलाल मेहता, व्हि.जी. राव अशा पुढाऱ्यांशी संबंध आले.वडिलांनी आपल्या ओळखीचे बारा मेंबर जमऊन,ब्याकवर्ड सर्वोदय को. अॉपरेटीव हौसिंग सोसायटीची स्थापना केली.वैकुंठलाल मेहतांच्या मध्यस्थीने सरकार कडून बांद्रा पूर्वची जागा मिळवली.

बातम्या

मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांचे एक आंतरराष्ट्रीय स्मारक असावे अशी खूप लोकांची इच्छा होती. त्यादृष्टीने विजय कांबळेंनी एक धम्मरथ तयार करून तो महाराष्ट्राच्या गावागावात फिरवून बाबासाहेबांच्या स्मारकाची कल्पना मांडली. चैत्यभूमी शेजारी असलेल्या इंदुमीलच्या जागी बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बनावे अशी मागणी तत्कालीन कॉंग्रेस सरकारकडे केली. १२ ते १५ वर्षे सतत पत्रव्यवहार करणे, मंत्री, मुख्यमंत्री, कितीतरीवेळा दिल्लीवारीही करावी लागली. पण तरीही सरकारला जाग येईना. शेवटी जेव्हा मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हा स्मारकाचा प्रश्न सुटला. मोदी सरकारने स्मारकासाठी मीलची जागा मिळवून दिली, आणि लगेचच ११ अॉक्टोबर २०१५ ला भूमीपूजनही केले.  [पुढे वाचा...]

आगामी कार्यक्रम
१२ डिसेंबर श्री नगर येथे सभा आयोजित...
दृष्टी आणि ध्येय

जशी "कामगार उत्कर्ष सभेचे स्थापना झाली, तशी एक एक कंपन्या संस्थेकडे येऊ लागल्या. संघटना काढण्यासाठी, युनियन चालविण्यासाठी मदत घेऊ लागले. आर. जे. मेहतांकडे असणारे जॉन टी. हार्डकर, बेडरॉक टायर, चँपियन इंजिनियरींग, बक मेक्यानिकल, गोल्डन टोब्याको आदि कारखानेही कामगार उत्कर्ष सभेच्या झेंड्याखाली आली. पुढे कृष्णा मोकल संघटनेत आले आणि पुढे पदाधिकारीही झाले. कामगारांच्या प्रश्नांसाठी लढता लढता विजय कांबळे १९८२ साली, रशीया आणि पूर्व युरोपीय देशांच्या कामगार संघटनांच्या जागतिक परिषदेत जाऊन आले.   [पुढे वाचा...]

व्हिडिओ
विजय कांबळे चा दलित समाजाला पाठींबा
विजय कांबळे चा दलित समाजाला पाठींबा
विजय कांबळे चा दलित समाजाला पाठींबा
विजय कांबळे चा दलित समाजाला पाठींबा
Vijay Kamble